English Marathi


Knowledge Centre  :   Articles

गोष्ट दीडशे गाव-ग्रंथालयांची   By: प्रकाश बापूराव अनभुले प्रकल्प संचालक NELPSPB, प्रगत शिक्षण संस्था, फलटण

“कोणत्याही बालकाला शिक्षणापासून वंचित ठेवले जाणार नाही आणि त्याचे मन मारले जाईल अशा शाळेत त्यालाजावे लागणार नाही,”

अशा एका जगाचे स्वप्न उराशी बाळगून महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण गावात१९७८ साली प्रगत शिक्षण संस्थेची सुरूवात झाली. अगदी वंचितांपासून ते उच्चवर्गीयांपर्यंत सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे आहे आणि प्रत्येकमूल जन्मतः शिकण्याच्या ज्या नैसर्गिक प्रेरणा घेऊन येते त्या शिक्षणाच्या प्रक्रियेत मारल्या जाऊ नयेत अथवा त्यांना लगाम बसू नये ही संस्थेची मुख्य तत्त्वे.

आकाशातील शाळा   By: प्रकाश अनभुले

रोजच्या दैनंदिनीप्रमाणे आमच्या शाळेतील वर्ग सुरु असतात. वर्गात तास सुरु असताना मुलांचा एक गट उठतो आणि तासाला असणाऱ्या शिक्षकाची परवानगी घेऊन वर्गाबाहेर पडतो. जवळच असणाऱ्या एक खोलीचा ताबा घेतो. अतिशय आकर्षक बांधकाम असलेल्या आणि दोन मोठाल्या काचेच्या भिंती असलेला हा वर्ग. आतमध्ये विशिष्ट रचनेत असलेले पाच संगणक. दुरीकडे भिंतीवर मोठी टीव्ही स्क्रीन. मुले टीव्ही स्क्रीन सुरु करतात. मग स्क्रीनला जोडलेला लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन सुरू होते. स्काईपच्या स्क्रीनवरून मुले आपल्या परदेशात बसलेल्या ग्रॅनीचे नाव शोधून व्हिडिओ कॉल सुरु करतात. क्षणात स्क्रीनवर त्यांची लाडकी ग्रॅनी अवकाशातून एखादा जिन अवतरावा तशी अवतरते. अतिशय उत्साहाने मुले स्क्रीनवर दिसणाऱ्या आपल्या ग्रॅनीला भर दुपारी गुड मॉर्निंग अथवा गुड इव्हनिंग किंवा ओला (स्पॅनिश मध्ये हॅलो) म्हणत असतात. ग्रॅनी मुलांना गुड आफ्टरनून म्हणतात तर कधी कधी एखादी ऑस्ट्रेलियातील ग्रॅनी मुलांनी शिकवल्यानुसार नमस्कार किंवा राम राम म्हणते. आणि मग सुरु होते त्यांची आकाशातील शाळा. 

आणि मारुती सापडला . . .   By: प्रकाश अनभुले

संध्याकाळी शाळेतून परत आलो होतो. घरी आल्यावर थोडे फ्रेश होऊन लगेच इंटरनेट सुरु केले होते. दिवाळीच्या सहलीचे बुकिंग करण्याची जोरदार तयारी सुरु होती. वेगवेगळ्या साईटवरून माहिती चालू होती मधेच फेसबुकवरती आमच्या सहलीची मार्गदर्शक असेलेली माझी मैत्रीण नादियाबरोबर चर्चा सरू होती.

 

तेवढ्यात आमच्या शेजारच्या ताई एक Pendrive घेऊन आल्या. त्या सांगत होत्या. त्यांचे पती फलटण वरून कोल्हापूरला जाताना मध्ये एका गृहस्थाला लिफ्ट दिली. तो पुढे कोल्हापूरमध्ये उतरला. पण उतरताना तो आपली बॅग मात्र गाडीतच विसरून गेला. त्याचा शोध नंतर घेण्याचा प्रयत्न केला पण तो काही सापडला नाही. त्याच्या बॅगमध्ये भली मोठी अभ्यासाची पुस्तके आणि एक Pendrive होता. त्या पुस्तकांमध्ये कुठे त्याचे नाव नव्हते. फक्त तो विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे आणि काही तरी संशोधनपर अभ्यास करतोय एवढाच बोध होत होता.

महाराष्ट्रकन्या   By: संपदा वागळे

 

लोकसत्ता चतुरंग, शनिवार, ३० ऑगस्ट २०१४ मध्ये प्रकाशित

 

मॅक्सिन बर्नसन ऊर्फ मॅक्सिन मावशी.. आज वय वर्षे एकोणऐंशी. मायभूमी अमेरिका सोडून कायमच्या भारतात आल्या त्या...फलटणमध्ये दलित मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवासात आणण्यासाठी नगरपालिकेच्या शाळांमध्ये त्यांना भरती करण्याचं काम हाती घेतलं...शाळा सोडलेल्या मुली, स्त्रियांसाठी साक्षरतेबरोबर शिवणवर्ग चालू केले... कमला निंबकर बालभवन ही शाळा सुरू केली...वयाच्या  ५५व्या वर्षी रिक्षा शिकलेल्या मॅक्सिन मावशी आज 'टीआयएसएस'च्या हैदराबाद शाखेत प्राध्यापक या नात्याने भाषाविषयक कौशल्ये शिकवत आहेत. त्यांच्याविषयी..

उत्तरदायित्व कोणाचे   By: डॉ. विवेक मॉंटेरो, गीता महाशब्दे

 

असरचा अहवाल काय सांगतोय? तर खासगी शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढली आहे आणि संपादणूक पातळी घसरली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये भागाकार येणाऱ्या मुलांची सरकारी संख्या १२ टक्क्यांनी आणि खाजगी शाळांमधील मुलांची संख्या २८ टक्क्यांनी घटली आहे. म्हणजे गुणवत्ता घसरण्यामागे खासगीकरण हे मुख्य कारण आहे, असा निष्कर्ष यावरून काढता येईल काय?

 

असरचा डाटाच असा आहे की, त्याचे निरनिराळे भाग पाहून त्यावरून हवे ते निष्कर्ष काढता येतील. पण असरचा अहवाल खरोखरच विसंबनीय आहे का, तो कितपत उपयोगी आहे हा खरा मुद्दा आहे.

 

महाराष्ट्र टाइम्स, १४ फेब्रुवारी २०१३ मध्ये प्रकाशित

 

http://www.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18493692.cms