English Marathi


Kamala Nimbkar Balbhavan  :   Students' Projects

 

Children do many projects in an academic year. Along with projects on various subjects like English, Marathi, science and geography they also work on environmental and computer-related projects. Children may select their own subject for a project or teachers may suggest a subject to them. Sometimes they do a group project and other times an individual one

 

The actual work starts after the selection of a subject. Children browse through the school library or the Internet, visit fields, interview people to collect information for their projects. They use many things like pictures, photographs, charts, graphs and paper cuttings to support the information.

 

The projects may not involve the collection of information each time. Writing fictions, making dictionaries and writing experiences can also be parts of a project.

 

Sometimes children take their projects to a next level by presenting it in the assembly with the help of the PowerPoint. This is especially done for the environment projects by the tenth standard students. These presentations are often a rich experience for the listeners.

 

Below are given some good projects by the students. Click on the name of the project and then say download to view it.

संगणक शिक्षणातील सर्जनशीलता

अजून एक Powerpoint Presentation.

Download
Write Your Reply
संगणक शिक्षणातील सर्जनशीलता

इयत्ता ७ वीचे संगणकाचे तास सुरू केले त्यावेळी माझा असे लक्षात आले की या मुलांची आकलन क्षमता चांगली आहे. त्यांचे काहीतरी वेगळे घ्यायला हवे.

 

मी मुलांकडून PowerPoint मध्ये काय काय करून घेता येईल त्याचा विचार केला व माझ्या कल्पना सरांना सांगितल्या. सरांनी मला त्यात थोडा बदल करुन त्या घेण्यास परवानगी दिली. मी PowerPoint मध्ये ६ प्रकारच्या नव्या activity घेतल्या.

 

१)      मोबाईलची जाहिरात

२)      सामाजिक विषय

३)      गोष्ट तयार करणे

४)      प्रश्नमंजुषा

५)      शब्दकोश

६)      एखादा सण

 

पहिल्या activity च्या वेळी माझ्या असे लक्षात आले मुले फक्त slides बनवत आहेत. त्या वेळी मी त्यांना काही बदल करण्यास सांगितल्यावर त्यांची त्यामधील गोडी वाढत गेली. व प्रत्येक वेळेस ती नव्या पद्धतीने presentation करू लागली. जी मुले कंटाळा करत होती अशा मुलांमध्येदेखील हळूहळू आवड निर्माण झाली.

 

दर तासाला मुले काही नवीन शिकायला मिळेल या उद्देशाने एकही तास चुकवत नाहीत. म्हणजेच हळूहळू आम्ही आमच्या उद्दिष्टाकडे पोहचत आहोत तर!

 

सुषमा पंडित

संगणक शिक्षिका, कमला निंबकर बालभवन

Download
Write Your Reply
Are You My Mother?

आपल्या शाळेतील सातवीतील एका दादाने तयार केलेले ‘तहानलेला कावळा’ या विषयीचे  अॅनिमेशन मी पाहिले होते.  तसेच  अॅनिमेशन आपल्यालाही तयार करता येईल असे मला वाटले. यानंतर माझ्या कम्प्यूटरच्या तासाला मी एक पिलू अंड्यातून बाहेर येताना दाखविले . ते इंग्लिशच्या विद्याताईंनी पाहिले आणि त्या म्हणाल्या, “तू ‘आर यू माय मदर’ चे एक असेच अॅनिमेशन तयार करु शकतेस.” मी जेव्हा ते तयार करायला घेतले तेव्हा प्रथम मला असे वाटले की ते लवकर होईल पण ते संपतच नव्हते. कारण एकूण गोष्ट दाखविण्यासाठी कमीत कमी अडीचशे स्लाईड्स तयार कराव्या लागणार होत्या. त्या मी रोज थोडे थोडे काम करुन पूर्ण करायच्या ठरविल्या. शेवटी हे अॅनिमेशन पूर्ण झाले! मला आशा आहे की हे अॅनिमेशन तुम्हाला नक्की आवडेल!!

 

जिऊ निमकर, इ. ५ वी

 

Download
Gallery
Write Your Reply
तहानलेला कावळा

 

आमच्या शाळेत इ. ५ वी पासून संगणक शिकविला जातो. नुसते संगणक हाताळणी न शिकविता  संगणकाचा वापर इतर शिकण्यातही व्हावा या उद्देशाला समोर ठेवून आमच्याकडे संगणक  शिक्षण दिले जाते. एकदा आम्हाला संगणकाची आणि Powepoint, Excel, Word  या Applications ची ओळख बऱ्यापैकी झाली की त्याचा वापर करून आम्ही विविध गोष्टी तयार करतो. मग त्यासाठी चित्रे काढणे. त्या काढलेल्या चित्रांवरून Animation तयार करणे अशा गोष्टी चालू होतात. त्यामुळे आम्ही जे शिकलो ते सर्व प्रत्यक्ष वापराची संधी मिळते आणि चांगले समजते सुद्धा. मी येथे अशीच एक गोष्ट घेतली आहे ती म्हणजे तहानलेला कावळा. या गोष्टीसाठी लागलेली सर्व चित्रे स्वतः काढलेली आहेत.

 

अनिकेत झंडे  इ. ७ वी, २०१२   

 

 

Download
Gallery
Write Your Reply
कागद निर्मिती व पुनर्वापर

 

आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टींपैकी कागद हा एक महत्वाची बाब आहे. कागद निर्मितीच्या उत्सुकतेपोटी मी हा विषय प्रकल्पासाठी निवडला. कागदाचा अतिरेकी वापर आणि वाया जाण्याचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत आहे याची जाणिव व्हावी हा देखील उद्धेश समोर ठेवला आहे.          

 

ऋतुराज कदम  इ. १० वी, २०१२   

Download
Gallery
Write Your Reply
निसर्ग पर्यटन

 

पर्यटन हा सर्वांच्याच आवडीचा विषय. त्यात निसर्ग पर्यटन म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. निसर्ग पर्यटनात आपण खूप काही शिकत असतो. पण आपल्याला त्याची जाणीव नसते. या निसर्ग पर्यटनाचा अभ्यास करून मी माझा पर्यावरण प्रकल्प केला. यामध्ये कोयना व्याघ्र प्रकल्पातील कुसवडे गावातील श्री. अजित साळुंखे यांची मुलाखत घेऊन कोयाना-चांदोली अभयारण्याचा पर्यटनाच्या दुर्ष्टीने अभ्यास केला आहे.         

 

अभिषेक शिंदे इ. १० वी, २०१२  

Download
Write Your Reply
हॉटेलच्या कचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन

 

आज माणसाची जीवनशैली आरामदायी झाली आहे. त्यामुळे माणसाला हॉटेल हे एक वेळ घालवण्याचे साधन झाले आहे. मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी तर सुट्टी मिळताच लोकं हॉटेलमध्ये तुडुंब गर्दी करतात. या हॉटेल्समध्ये विघटनशील तेच अ विघटनशील कचरा मोठ्या प्रमाणात तयार होत असतो. त्याची योग्य रितीने विल्हेवाट लावणे गरजेच असते.

 

याच विषयावर मी एक अभ्यासपूर्ण प्रकल्प गेला आहे हॉटेलच्या कचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन.       

 

सायली परुळेकर इ. ९ वी, २०१२

Download
Gallery
Write Your Reply