English Marathi


Palakneeti

 

आपल्या सभोवतीच्या अनेक मुलांचे- त्यात आपलं मूलही आलंच, आपण पालक असतोच हे पालकपण समजदारपणे निभावत भद्रतेच्या वाटेवर आत्मविश्वासानं पाऊल टाकताना आपल्याला विचार करावाच लागतो. ह्या वाटेवर शिस्त, शिक्षा, स्पर्धा, आनंदशिक्षण, गुणवत्ता, लैंगिकतेची समज, इ. अनेक निसरड्या जागा आहेत. त्यांचा विचार तहान लागल्यावर नाही तर आधीपासूनच करायला हवा, पालकपण निभावताना साथीला असलेलं हितगुज करणारं हे मासिक आहे.

 

१९८७ पासून हे मासिक नियमीतपणे प्रसिद्ध होत आहे. सुजाण पालकत्व या विषयाला वाहिलेलं मराठी भाषेतील हे एकमेव मासिक आहे. जानेवारी २०१५ पासून प्रगत शिक्षण संस्था, फलटण आणि उगम गट, सावंतवाडी यांनी या मासिकाच्या एका वर्षांच्या अंकांचे प्रकाशनाचे काम हाती घेतले आहे. 

 

 ई-पालकनीती वाचण्यासाठी मासिकाच्या मुखपृष्ठावर क्लिक करा.