उत्तरदायित्व कोणाचे By: डॉ. विवेक मॉंटेरो, गीता महाशब्दे |
असरचा अहवाल काय सांगतोय? तर खासगी शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढली आहे आणि संपादणूक पातळी घसरली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये भागाकार येणाऱ्या मुलांची सरकारी संख्या १२ टक्क्यांनी आणि खाजगी शाळांमधील मुलांची संख्या २८ टक्क्यांनी घटली आहे. म्हणजे गुणवत्ता घसरण्यामागे खासगीकरण हे मुख्य कारण आहे, असा निष्कर्ष यावरून काढता येईल काय?
असरचा डाटाच असा आहे की, त्याचे निरनिराळे भाग पाहून त्यावरून हवे ते निष्कर्ष काढता येतील. पण असरचा अहवाल खरोखरच विसंबनीय आहे का, तो कितपत उपयोगी आहे हा खरा मुद्दा आहे.
महाराष्ट्र टाइम्स, १४ फेब्रुवारी २०१३ मध्ये प्रकाशित
http://www.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18493692.cms
|
महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचे निदान By: डॉ. विवेक माँटेरो, गीता महाशब्दे |
विद्यार्थ्यांच्या वाचन आणि गणित या क्षेत्रांतल्या कामगिरीचे विश्लेषण असलेला अहवाल -'असर २०१२' प्रकाशित झाला आहे. त्यातील निदानाची दखल घेऊन महाराष्ट्राने 'असरकारी' उपाययोजना अमलात आणण्याची गरज डॉ. वसंत काळपांडे यांनी लेख लिहून व्यक्त केली. त्यांच्या लेखातील प्रतिपादनाला आक्षेप घेणारा लेख..
लोकसत्ता, ५ फेब्रुवारी, २०१३ मध्ये प्रकाशित, http://epaper.loksatta.com/87507/indian-express/05-02-2013#page/7/2
डॉ. वसंत काळपांडे यांचा मूळ लेख वाचण्यासाठी: http://www.loksatta.com/sampadkiya-news/asar-report-2012-and-ungovernament-solution-45761/
|
नव्या धोरणाला नापास करण्याची घाई नको By: गीता महाशब्दे |
सध्याच्या स्पर्धात्मक परीक्षेत अपयशाचे खापर नेहमीच बालकावर फोडले जाते. ढ हे लेबल चिकटवले की शिक्षक, पालक यांच्याइतकेच स्वतः बालक सुद्धा ते स्वीकारून टाकते. त्यामुळे व्यवस्थेचे देखील फावते. शिकायला मदतकारी असे मूल्यमापन करीत प्रत्येकाला शिकेपर्यंत शिकवायचे म्हणजे आपली जबाबदारी वाढते. ती झटकण्याची, कायद्यातील तरतुदींनाच चूक ठरविण्याची किती ही घाई आपण करीत असतो?
सकाळ, ४ फेब्रुवारी २०१३ मध्ये प्रकाशित. http://epaper1.esakal.com/4Feb2013/Enlarge/PuneCity/page6.htm |