Pragat Shikshan Sanstha

English Marathi


To Write Your Blogs Click Here:

रिलेशानी:आरोग्य भान शिबीर

पुण्याचे डॉ. मोहन देस आणि त्यांच्या आरोग्य भान (आभा) टीमचे सदस्य यांच्या रिलेशानी शिबिराचे कमला निंबकर बालभवन, फलटण येथे १० डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२१ रोजी आयोजन करण्यात आले होते. रिलेशानी  म्हणजे शानदार समृद्ध छान रिलेशनशिप किंवा नातेसंबंध. आभा टीमने नववी-दहावी मधल्या मुलामुलींशी संवाद साधला.  

 

या शिबिरामध्ये किशोरवयीन मुलांचे प्रश्न, स्वत:च्या मनाबद्दल, शरीराबद्दल कुतूहल,मुलींमधील मासिक पाळी तसेच  लैंगिकतेविषयी उत्सुकता, या वयात होणारे बदल कसे हाताळावेत, मैत्री, प्रेम, आकर्षण यातील सीमारेषा इत्यादी विषयांवर चर्चा झाली. जिज्ञासेपोटी मुले वेगवेगळ्या माध्यमातून माहिती मिळवतात. ही माहिती खरी असेलच असे नाही आणि घरात तर हे कधीही न बोलले जाणारे विषय. या शिबिरामुळे मुले हळूहळू का होईना पण व्यक्त होऊ लागली. कृती, गटकाम, गाणे, चित्रे रेखाटने या माध्यमातून या शिबिरात सर्वजण मग्न झाले होते.

 

मासिक पाळीत स्त्रीला हीन वागणूक दिली जाते असे न करता आपण तिची मासिक पाळी मध्ये कशी काळजी घेतली पाहिजे, तिला मदत केली पाहिजे  हे मुलांना समजले. तसेच मुलींना मासिक पाळीत सॅनिटरी पॅड न वापरता menstrual cup वापरा असे आवाहन शिबिरात केले गेले, कारण एक पॅड चे विघटन होण्यासाठी जवळ जवळ ५०० वर्षे लागतात.

 

मुलांसोबत आम्ही शिक्षकांनीही ही कार्यशाळा केली. या शिबिरात मुलांना पडणाऱ्या लैंगिकतेविषयीच्या  विविध प्रश्नाची नेमकी व शास्त्रीय माहिती अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मिळाली. त्यामुळे मुले त्यांचे विचार मन मोकळेपणे मांडू शकली आणि त्यांच्या मनातील संकोच दूर झाला.  

 

शिबिराच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यानी पालक सभा घेऊन पालकांना, या शिबिरात जे काही  शिकायला मिळाले त्याचे सादरीकरण करून दाखवले.  या सर्व गोष्टी मुले अगदी सहजपणे पालकांसमोर मांडत होती. पालकांनाही मुलांमधील हा बदल व स्थिरता जाणवली. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पालकांनी शाळेचे कौतुक केले.

 

काही मुलांनी शिबिरानंतर मांडलेले विचार:

 

I had some idea about this workshop as my elder sister had told me. I was very excited to attend it so when I came to know that it had been postponed my mood went off.

 

But finally, after a week there we were in the school assembly hall with colourful clothes and minds filled with curiosities. There we met very sweet Mohan kaka for the first time. Mohan Kaka is a doctor. He introduced us to our antarman (internal mind). On the first day we had to create and perform skits on given topics. Our group had to show how people treat girls in their periods. Other groups had topics like child marriage, insult etc. Every group performed very cleverly.

 

Some students were awkward on the second day of the workshop because we were talking about periods and pregnancy. But it is important to learn these things. If we have correct information about it then we can avoid taking wrong step in our future.

 

On the last day of the workshop presented what we learned in front of our parents. They were very proud of us.

I want to tell you that everyone should do this workshop. In these three days we learnt to speak freely and became confident about our own bodies and minds.

 

Prachiti Amit Doshi, 9th

 

 

ताईंनी शिबिराबद्दल सांगितले तेव्हा रिलेशानी हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. रिलेशानी म्हणजे शानदार नातेसंबंध. शिबिराची सुरुवात उद्घाटनाने झाली. प्रमुख पाहुणेही आम्हीच होतो. आम्ही सर्वांनी मिळून अमिबा पेशीचे रचनाशिल्प तयार केले. झाले उद्घाटन! असे अनोखे उद्घाटन मी पहिल्यांदाच पाहिले. नंतर आम्हाला आमच्या नावापुढे निसर्गातील कोणत्याही गोष्टीचे नाव जोडायला सांगितले. मी अंजली तारा असे नाव ठेवले. कारण तारा जसा चमकतो तसे मला चमकायचे आहे. रिलेशानी टीमने आणि आम्ही मिळून माझ्या अंगणात झाडाचं लई काम रं ,शरीराच्या या गावाला, ओ माय चेचे अशी गाणी म्हटलो. गाणी म्हणल्यावर छान तर वाटलेच आणि गाण्यातून झाडाचे काम, शरीराची माहितीही समजली. आम्ही आमच्या शरीरांची चैतन्य चित्रे काढली. आपल्याला कशाने चैतन्य मिळते त्या वस्तू आपल्या शरीराच्या आत काढायच्या होत्या.

 

आम्ही अजून एक शिल्प तयार केले होते बाळाच्या जन्माचे. आम्ही गर्भाशयाची भिंत बनलो होतो. काही मुले वार बनली होती तर काहीजण बाळवाट. आदिती बाळ बनली होती. काही मुले-मुली डॉक्टर आणि नर्स. आम्ही सर्वांनी बाळाचा जन्म अनुभवला. बाळ श्वास कसे घेते, त्याला अन्न कोठून मिळते हे समजले. बाळासाठी शरीराची कोणती तयारी होते, मासिक पाळी म्हणजे काय, menstrual cup ची रचना, शुक्राणूंचे काम अशा अनेक नव्या गोष्टी समजल्या.

 

शेवटच्या दिवशी जे जे शिकलो ते पालकांसमोर सादर करायचे होते. थोडी भीती वाटत होती पण चांगले सादर झाली. मोहन काका, अंजली ताई, श्रुती ताई, अश्विनी ताई, सचिन दादा, विनय दादा यांनी आम्हाला छान समजून घेतले आणि समजावून सांगितले.         

 

अंजली राऊत, इ.९ वी 

 

On the first day it was quite awkward for us. I was too scared to answer the questions. Mohan kaka told us that we were going to speak our mind without any tension.

 

In my opinion the most important topic was about women’s periods and male and female reproductive system. This is very important for everyone to learn about. Lots of people follow superstitions. During their periods girls are not allowed to go into the temples. I hate this thought. Releshani team showed us that the process of getting periods is very scientific. In my opinion this process should reach to everyone. I also talked about this process to some women who live near my house and they replied to me very positively that from now on they will not follow the superstitions. They didn’t know about this process, and I helped them to understand it.

 

If this workshop happens again, I will definitely attend it and I will try to speak better next time.

 

Sajal Kachare, 9th

 

डिसेंबर महिन्यात शाळेत झालेले ‘रिलेशानी शिबीर’ हे एक अत्यंत महत्वाचे व फायदेशीर असे शिबीर होते. मोहन देस काकांनी व त्यांच्या टीमने शानदार, समृद्ध, छान नातेसंबंध याबद्दल तीन दिवस आमच्याशी संवाद साधला.

 

या सत्रात मला सर्वच मुद्दे अतिशय महत्वाचे वाटले. उदा. आम्हाला त्यांनी बाळ जन्माला कसे व कोणत्या मार्गाने येते हे व्यवस्थित नाटकाद्वारे समजून सांगितले. एक स्त्री कशी आई होते हे खरच मला माहीत नव्हते. ती सर्व माहिती त्यांनी सविस्तर समजावून सांगितल्यामुळे माझ्या मनात असणाऱ्या अनेक शंका कमी झाल्या. या शिबिरामुळे मी स्वत:च्या मनाला व शरीराला चांगल्या प्रकारे ओळखू लागले. मासिक पाळीत होणाऱ्या त्रास, राग, संताप, समाज, वेगळेपणा, याबद्दलही अनेक प्रश्न होते. या प्रश्नांबद्दल व्यवस्थित संवाद झाल्याने माझे मन शांत झाले.

 

या शिबिरातून मला जे शिकायला मिळाले ते मी माझ्या आईशी शेअर केले. हे सर्व काही असेच असत का? हे खरे आहे का? असे प्रश्न मी तिला विचारले. यावर आईनेपण ही सर्व माहिती बरोबर आहे असे सांगितले. मी अशा कोणत्याच विषयावर आईबरोबर कधीच मनमोकळेपणाने बोलले नव्हते ते मी या शिबिरामुळे अत्यंत बिनधास्तपणे व अगदी मैत्रिणीसारखे तिच्याशी बोलू शकले.

 

रिलेशानी शिबीरामध्ये जवळ-जवळ सर्वच विषयांवर प्रकाश टाकला होता पण मला असे वाटते की महिलांवरील बलात्कार, लैंगिक अत्याचार, शोषण काय असते याबद्दल सविस्तर माहिती सांगून ते रोखण्यासाठी काय करायचे तसेच  स्वसंरक्षण कसे करायचे हेही सांगायला हवे होते.

 

या शिबिरामध्ये मला सर्वात जास्त एक मुद्दा आवडला तो म्हणजे मोहन काकांनी आम्हाला आमचे एक स्वत:चे नाव ठेवायला सांगितले होते. माझे ‘जिया स्काय’ हे नाव मी कधीच विसरू शकणार नाही.

 

जिया मोमीन, इ.९ वी      

 


पूनम वाघमारे

Previous Reply

Your Reply

*
*