Pragat Shikshan Sanstha

English Marathi


To Write Your Blogs Click Here:

आगळेवेगळे पर्यावरण प्रकल्प

 

इयत्ता ९ वी १० वी च्या वर्षात मिळून पर्यावरण प्रकल्प शाळेमध्ये केला जातो. मुले इयत्ता ९ मध्ये आपल्याला जाणवलेली समस्या किंवा आपली आवड पर्यावरणातील ज्या एका विशिष्ट विषयामध्ये आहे तो विषय निवडतात. विषय निवडीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. यामध्ये मुले ग्रंथ संशोधन, इंटरनेट वरून माहिती काढणे, क्षेत्रभेटी, मुलाखती, प्रयोग करणे इत्यादी अध्ययन तंत्राचा वापर करून माहिती गोळा करतात. प्रस्तावना, उद्देश, ध्येय, विषय मांडणी, आभार व ग्रंथसंदर्भ या मुद्यांच्या आधारे प्रकल्प लिहितात. प्रकल्पात अनेक फोटो, चार्ट, आलेख, चित्र, कात्रणे यांचा समावेश असतो.

 

प्रकल्प तयार करूनच मुले थांबत नाहीत तर प्रकल्पाच्या पॉवर पॉईंट स्लाईड्स तयार करून प्रार्थनेच्या वेळी सर्व मुलांच्या समोर सादर करतात. सादरीकरण झाल्यावर प्रेक्षकातील इयता ४ थी ते १० वी चे विद्यार्थी विविध प्रश्न विचारतात. प्रकल्प करणारे विद्यार्थी त्यांची उत्तरे देतात.

 

याच कामाच्या आधारे या विद्यार्थ्यांना शाळेकडून व्हाईस अॅडमिरल मनोहर आवटी यांनी दिलेला कै. महेश्वर करमरकर व श्रीमती लीला महेश्वर करमरकर पर्यावरण पुरस्कार दिला जातो. पुरस्कारासाठी मुले निवडताना सादरीकरणासाठी ५० गुण तर प्रकल्पासाठी ५० गुण दिले जातात. सादरीकरणातील गुणांसाठी विद्यार्थ्यांचा आवाज, व्यक्तिमत्व, पॉवर पॉईंटची प्रत, मुलांवरील प्रभाव, वेळ, प्रश्नांची उत्तरे देण्याची कुवत हे मुद्दे वापरून गुणदान केले जाते. तर प्रकल्पासाठी विषय निवड, मांडणी, सर्वेक्षण, मुलाखती, प्रत्यक्ष काम, लागलेला वेळ हे मुद्दे लक्षात घेतले जातात.

 

या प्रकल्पांचे सादरीकरण पाहणे हाही सर्वांसाठी एक समृद्ध करणारा अनुभव असतो.

 

पुढे काही मुलांचे प्रकल्प दिले आहेत. प्रकल्पपाहण्यासाठी प्रकल्पाच्या नावावर क्लीक करावे.

 

१.

होटेल कचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन 

 

२.

कागद निर्मिती व पुनर्वापर

 

३.

निसर्ग पर्यटन

 


विशाल आंधळकर, भूगोल व पर्यावरण शिक्षक, कमला निंबकर बालभवन

Previous Reply

rrgdrwxvse   [ 07/07/2015 ]

gordon   [ 12/04/2015 ]

jmoswzmcodx   [ 05/01/2015 ]

Juan   [ 11/05/2014 ]

Brooklyn   [ 04/04/2014 ]

Your Reply

*
*