Pragat Shikshan Sanstha

English Marathi


To Write Your Blogs Click Here:

कागदी पट्ट्यांपासून चटई बनवणे

पर्यावरण प्रकल्पाला अनुसरून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे. याबद्दल मुलांसोबत गप्पा करताना आपण कागदापासून कोणकोणत्या वस्तू बनवू शकतो. हे विचारल्यानंतर मुलांनी काही वस्तू सांगितल्या. उदा. घडीकामापासून कुत्रा, होडी, पंखा, लगद्यापासून काही भांडी, चिकटकामासाठी वापरू शकतो. त्यातील एकाने चटई सांगितली. ताईंनी विचारलं कुठ पाहिलीस का ? कागदी चटई ? त्यावर तो म्हणाला शाळेत मुलांनी मांडलेल्या प्रदर्शनात ती पहिली. ती पट्यांची होती. मग आम्ही पाठकोऱ्या कागदांचा वापर करून चटई बनवायची असे ठरवले.

 

सुरवातीला आम्ही कागद वॉटरकलरने मुलांना रंगवायला दिले. वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेल्या कागदांवर पट्टीने रेषा मारून मुलांना कापायला दिल्या. यानंतर वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या एकत्र ठेऊन आम्ही चटई बनवायला सुरुवात केली. सर्वात अगोदर एका रंगाची पट्टी घेऊन त्यावर जवळजवळ वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या एकत्र ठेवूनआम्ही चटई बनवायला सुरुवात केली. सर्वात अगोदर एका रंगाची पट्टी घेऊन त्यावर जवळ जवळ वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या आलटून पालटून चिटकवल्या. त्यानंतर खालच्या बाजूने चीटकवलेल्या पट्ट्यांवर पुन्हा एक पट्टी चीटकवली . परत वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या आडव्या बाजूने चीटकवत चटई विनली. आडव्या चीटकवलेल्या पट्ट्या उभ्या पट्ट्यांच्या मधून एकाड एक खालून वर वरून खाली असे करत चटई विनली.

 

मुलांना चटई विणताना मज्जा आली. मुले १० ते १५ मिनिटे एका ठिकाणी बसून काम करायला शिकली. तसेच हस्तनेत्र समन्वय साधून चटई विणायला शिकली. सुरवातीला विणताना थोडा गोंधळ होत होता. पण नंतर ज्या मुलांनी सुरुवातीला चटई (ताईसोबत) बनवली. त्यांनी इतरांना छान समजावले. 


निलोफर शेख, बालवाडी शिक्षिका

Previous Reply

Your Reply

*
*