Pragat Shikshan Sanstha

English Marathi


To Write Your Blogs Click Here:

ताई, ग्रॅनी सेशन लवकर सुरू करा!

सकाळचे दहा- साडेदहा वाजले असतील. माझं नवीन संगणक खोली आवरायचं काम सुरु होतं. तेव्हा मोठ्या गटाच्या समीराताई तिथे आल्या आणि काही कागद माझ्या हातात दिले. त्या कागदांवर काही चित्रे काढलेली होती आणि भरपूर लिहिलं होतं. ताईंनी सांगितलं, “ही मोठ्या गटातील मुलांनी तुम्हाला लिहिलेली पत्रं आहेत. ग्रॅनी सेशन कधी सुरू होणार? म्हणून ही पत्रं लिहली आहेत.” ती पत्रं पाहून मला कळेनाच की काय प्रतिक्रिया द्यावी. मी वाचायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की मुलांची ग्रॅनींशी किती भावनिक जवळीक निर्माण झाली आहे!

 

त्यांची सगळी चित्रं पाहून, त्याचं लेखन वाचून, त्यातून सोल रूम, ग्रॅनी सेशन आणि ग्रॅनींच्याबद्दल मुलांना असणारी आपुलकी वेगवेगळ्या प्रकारात पहायला मिळाली. ही ४ ते ५ वर्षांची मुलं किती उत्सुक होती ग्रॅनींना भेटण्यासाठी ! त्या मुलांपैकी काहींना उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेल्या गमती-जमती ग्रॅनींना सांगायच्या होत्या, काहींना ग्रॅनींच्या गोष्टी ऐकायच्या होत्या तर काहींना ग्रॅनींना पहायचं होतं, ग्रॅनींसोबत गाणी म्हणायची होती. त्यांचा तो उत्साह पाहून मलासुद्धा खूप लवकरात लवकर संगणक खोलीचं काम पूर्ण होऊन ग्रॅनी सेशन्स सुरू व्हावीत असं वाटू लागलं आणि त्यासाठी मी जोरात कामाला लागले.


योगिता जगताप, संगणक शिक्षिका, कमला निंबकर बालभवन

Previous Reply

Your Reply

*
*